Ad will apear here
Next
‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०१७’च्या कक्ष कार्यालयाचे उद्घाटन
ठाणे : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी स्पर्धकांना नोंदणी करता यावी, तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी ठाणे महानगरपालिकेतील धर्मवीर आनंद दिघे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या वेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, उमेश पाटील, सिद्धार्थ ओवळेकर, नरेंद्र सूरकर, गुरमुखसिंग स्यान, योगेश जानकर, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिव अशोक आहेर, सदस्य एकनाथ पवळे, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी मुंबई-ठाण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे ‘आर्मी’मधील नामवंत खेळाडू सहभागी होत असतात. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी, तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज, चेस्ट नंबर आदी आनुषंगिक कामांची पूर्तता करता यावी, यासाठी मॅरेथॉनचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. स्पर्धकांची नोंद करता यावी, तसेच स्पर्धकांना माहिती मिळावी व संपर्क साधता यावा यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेबाबतच्या बैठकाही या कार्यालयात होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा विविध नऊ गटांत ही स्पर्धा होणार आहे. तसेच यंदा पारसिकनगर खारेगाव ते महापालिका भवन ही १० किलोमीटरची आणखी एक मॅरेथॉन होणार असून, प्रत्येक स्पर्धकाची नोंद या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या वेळी केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZMCBE
Similar Posts
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा ठाणे : स्तनपानाचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स, घोषवाक्य स्पर्धा, कार्यशाळा आणि चर्चासत्र आणि स्तनपानाचे महत्त्व सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. स्तनपान सप्ताह सांगता कार्यक्रमासाठी
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
नारायणराव कोळी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ठाणे : ठाण्याचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय नारायणराव गोविंद कोळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेला व कोपरीच्या चेंदणी कोळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्याला महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language